II गण गण गणात बोते II अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंदा सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ II गण गण गणात बोते II मित्रानो, तुम्ही येथे मोफत [Free] विविध स्पर्धा परीक्षासाठी ऑनलाईन (ई-टेस्ट) सराव पेपर देऊन त्वरित निकाल पाहू शकता.!

इतर महत्वाचे!


" महाराष्ट्रातील घाट घाटाचे नावे कि.मी. मार्ग:


1) राम घाट ७ कि. मी. कोल्हापुर - सावंतवाडी

2) अंबोली घाट १२ कि. मी. कोल्हापुर - सावंतवाडी
3) फोंडा घाट ९ कि. मी. संगमेश्वर - कोल्हापुर
4) हनुमंते घाट १० कि. मी. कोल्हापुर - कुडाळ
5) करूळ घाट ८ कि. मी. कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट ११ कि. मी. कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट सातारा - रत्नागिरी
11) पार घाट १० कि. मी. सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट ५ कि. मी. सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट ५ कि. मी. महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट ४ कि. मी. पोलादपुर - वाई
16) बोरघाट १५ कि. मी. पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट १० कि. मी. पुणे - पनवेल
18) कुसुर घाट ५ कि. मी. पुणे - पनवेल
19) वरंधा घाट ५ कि. मी. पुणे - महाड
20) रूपत्या घाट ७ कि. मी. पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट ६ कि. मी. पुणे - महाड
22 ) कसारा घाट ८ कि. मी. नाशिक - मुंबई
23 ) नाणे घाट १२ कि. मी. अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट ७ कि. मी. नाशिक - मुंबई
25 माळशेज घाट ९ कि. मी. नाशिक - मुंबई
26) सारसा घाट ५ कि. मी. सिरोंचा - चंद्रपुर"
वरिल माहिती देणारे: प्रशांत, बीड

***** पंचवार्षिक योजना*****

१ एप्रिल, १९५१ पासून भारतात आर्थिक नियोजनास सुरवात झाली. ही पद्धती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हापासून ११ योजना पूर्ण झाल्या असून १२ वी योजना चालू आहे. ७ वार्षिक योजनाही भारतात राबवण्यात आल्या त्यातील १९६६-६९ च्या कलावधिसच योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात. आज भारतीय अर्थव्यवस्था नियोजित आहे मात्र तिचा प्रवास मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालू आहे. पहिली पंचवार्षिक योजना कालावधी : १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६
प्राधान्य : कृषि क्षेत्र
मॉडेल : Harrod-Domar Model
खर्च : प्रस्तावित खर्च- २३७८ कोटी रु., वास्तविक खर्च- १९६० कोटी रु. प्रकल्प :
१. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)
२. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)
३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)
४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)
५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना
६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना.
७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना.
८. HMT- बँगलोर
९. हिंदुस्थान एंटीबायोटिक महत्वपूर्ण घटना :
१. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू.
२. community development programme 1952
३. अखिल भारतीय हातमाग बोर्ड (१९५२) आणि अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड (१९५३) स्थापना.
४. १९५५ मध्ये गोरवाल समितीच्या शिफासासिनुसार इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.
५. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (१९५५)
मूल्यमापन :
योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली.
अन्न धान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१-५२) ६५.८ दशलक्ष टनापर्यंत (१९५५-५६) वाढले.
आर्थिक वाढीचा दर २.१% (संकल्पित) ३.६% (साध्य)
राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोही उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतीचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला.
दुसरी पंचवार्षिक योजना (नेहरू-महालनोबीस योजना) कालावधी : १ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१
प्राधान्य : जड व मुलभुत उद्योग
मॉडेल : Mahalanobis Model
खर्च : प्रस्तावित खर्च- ४८०० कोटी रु., वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु. प्रकल्प :
१. भिलाई पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने
२. रुरकेला पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने
३. दुर्गापूर पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने
४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ
५. नानगल व रुरकेला खत कारखाने. महत्वपूर्ण घटना :
१. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर.
२. Intensive Agriculture district programme – (1960)
मूल्यमापन -
आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य)
किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला. तिसरी पंचवार्षिक योजना कालावधी : १ एप्रिल १९६१ ते ३१ मार्च १९६६
प्राधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)
खर्च : प्रस्तावित खर्च- ७५०० कोटी रु., वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु. प्रकल्प :
१. Intensive Agriculture Area programme-1964-65
२. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना ३ वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून
Commission for Agricultural Costs and Prices
करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला)
३.Food Corporation of India (१९६५)
४. १९६४ मध्ये IDBI UTI ची स्थापना करण्यात आली. महत्वपूर्ण घटना :
१. १९६२ चे चीन युद्ध.
२. १९६५ चे पाकीस्थान युद्ध.
३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ. मूल्यमापन -
तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली.
अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले.
भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले. १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले. योजनेला सुट्टी (PLAN HOLIDAY) तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेल्या आर्थिक अस्थेर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरु करता आली नाही. हि सुटी १ एप्रिल,१९६६ ते ३१ मार्च, १९६९ दरम्यान राहिली. या सुट्टीच्या कालावधीत सरकारने तीन वार्षिक योजना राबवल्या ज्यांचे उद्दिष्ठ स्वावलंबन हे होते.
१) पहिली वार्षिक योजना (१९६६-६७)
१९६६ च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला.
६ जून १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.
२) दुसरी वार्षिक योजना (१९६७-६८)
हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरवात झाली.
१९६७-६८ मध्ये अन्नधान्यांचे उच्चांकी उत्पादन झाले. ३) तिसरी वार्षिक योजना (१९६८-६९)
अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या.
व्यवहारतोल सुधारला व चौथी योजना सुरु करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.
चौथी पंचवार्षिक योजना (गाडगीळ योजना)
कालावधी : १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
प्राधान्य : स्वावलंबन
घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ
मॉडेल : Open Consistency Model
खर्च : प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु. प्रकल्प :
१. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973)
२. Small Farmer Development Agency (SFDA)
३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२)
४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३) महत्वपूर्ण घटना
१. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला.
२. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली.
४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३)
५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता.
६. Foreign Exchange Regulation Act-1973 मूल्यमापन :
काही प्रमाणात अपयश आले.
करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध - १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (Oil Shocks) पाचवी पंचवार्षिक योजना कालावधी : १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७९
प्राधान्य : दारिद्र्य निर्मुलन
खर्च : प्रस्तावित खर्च- ३७,२५० कोटी रु., वास्तविक खर्च- ३९,४२६ कोटी रु. प्रकल्प :
१. Training Rural Youth for Self Employment (TRYSEM)
२. Integrated Child Development Services
३. Desert Development Programmeमहत्वपूर्ण घटना :
१. १९७६-७७ मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल अनुकूल राहिला.
२. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर. (१९७६) मूल्यमापन :
दारिद्र्य निर्मुलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश.
राजकीय घटना :
२५ जून १९७५ तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर.
२६ जून १९७५ वीस कलमी कार्यक्रमास सुरवात.
मार्च १९७७ जनता पार्टीचे सरकार आले.
मार्च १९७८ जनता सरकारने पाचवी योजना संपुष्ठात आणली.
१ एप्रिल १९७८ मध्ये जनता सरकारने स्वतःची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली.
जानेवारी १९८० मध्ये कॉंग्रेस (आय) ने सरकती योजना फेटाळली.
१ एप्रिल १९८० नवीन सहावी योजना सुरु करण्यात आली. सहावी पंचवार्षिक योजना कालावधी : १ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५
प्राधान्य : दारिद्या निर्मुलन व रोजगार निर्मिती
मॉडेल : Alan Manne and Ashok Rudra Model
खर्च : प्रस्तावित खर्च- ९७,५०० कोटी रु., वास्तविक खर्च- १,०९,२९२ कोटी रु. प्रकल्प :
१. Integrated Rural Development Programme (IRDP)
२. National Rural Employment Programme (NREP)
३. Rural-Landless Employment Guarantee Programme (RLEGP)
४. Development Of Women And Children In Rural Areas (DWCRA)
५. नवीन २० कलमी कार्यक्रम
६. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प (आंध्र प्रदेश)
७. सलेम पोलाद प्रकल्प (तामिळनाडू)
महत्वपूर्ण घटना :
१५ एप्रिल १९८० रोजी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
जानेवारी १९८२ मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि जुलै १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली.
देशास अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले. मूल्यमापन :
हि योजना यशस्वी ठरली.
वाढीचा दर ५ टक्क्यापेक्षा अधिक सध्या होण्यास सुरवात झाली.
सातवी पंचवार्षिक योजना कालावधी : १ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०
प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती
घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता'
मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान
खर्च : प्रस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु., वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी रु. प्रकल्प :
१. इंदिरा आवास योजना-RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली.
२. Million Wells Scheme
३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART)
४. जवाहर रोजगार योजना- NREP RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. मूल्यमापन :
या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात.
दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली. सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या. आठवी पंचवार्षिक योजना कालावधी : १ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७
प्राधान्य : मनुष्यबळ विकास
घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता'
मॉडेल : Export-led Growth Model
खर्च : प्रस्तावित खर्च- ४,३४,१२० कोटी रु., वास्तविक खर्च- ४,७४,११२ कोटी रु. प्रकल्प :
१. राष्ट्रीय महिला कोष-१९९२-९३
२. Employment Assurance Scheme (EAS)
३. Prime Minister's Rozgar Yojana (PMRY)
४. Mahila Samridhi Yojana
५. Member of Parliament Local Area Development Scheme (MPLADS)
६. NATIONAL SOCIAL ASSISTANCE PROGRAMME(NSAP)
७. Mid-Day Meal Scheme
८. Indira Mahila Yojanaमहत्वपूर्ण घटना :
सार्वजनिक शेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणूकीची प्रक्रिया सुरु झाली.
१९९४-९५ मध्ये रुपया चालू खात्यावर पूर्ण परीवातानीय करण्यात आला.(Full convertibility of Rupee on Current account)
१९९२ मध्ये SEBI ला संविधानिक दर्जा देण्यात आला.
१९९२ मध्ये ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेस संविधानिक दर्जा देण्यात आला.
मूल्यमापन :
योजना सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी. वाढीचा दर सरासरी ६.६८ इतका साध्य झाला.
कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ३.९%
उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ८.०%
सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ७.९% नववी पंचवार्षिक योजना कालावधी : १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२
प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती
घोषवाक्य : सामाजिक न्याय आणि समनतेसह आर्थिक वाढ.
खर्च : प्रस्तावित खर्च- ८,९५ ,२०० कोटी रु., वास्तविक खर्च- ९,४१,०४० कोटी रु. प्रकल्प :
१. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना(१५ ऑगस्ट १९९७)- स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शाळा काढणे.
२. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना(डिसेंबर १९९७)- शहरातील बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार
३. भाग्यश्री बाल कल्याण योजना
४. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना(१९ ऑक्टोबर १९९८)- स्त्रियांसाठी विमा संरक्षण
५. अन्नपूर्णा रोजाना(मार्च १९९९) - पेन्शन न मिळणाऱ्या जेष्ठ नागरिकांना १० किलो अन्नधान्य पुरवठा.
६. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना(१ एप्रिल १९९९)- IRDP, TRYSEM, DWCRA, SITRA, गंगा कल्याण योजना, दशलक्ष विहिरींची योजना या सहा योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली.
७. जवाहर ग्राम समृद्धी योजना(१ एप्रिल १९९९)- सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती.
८. अंत्योदय योजना(२५ डिसेम्बर २०००)- स्वस्त भावाने अन्नधान्य.
९. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना(२५ डिसेम्बर २०००)
१०. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना(२०००-०१)- प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण पेयजल, पोषण, ग्रामीण विद्युतीकरण.
११. सर्व शिक्षा अभियान(२००१)- शिक्षण न घेणाऱ्या मुलांची संख्या कमी करणे. महत्वपूर्ण घटना :
National Highways Development Programme
हाती घेण्यात आला.
सार्वजनिक शेत्रातील उद्योगांना स्वायत्तता देण्यासाठी नवरत्न व मिनिरत्न शृंखला सुरु करण्यात आली.
कृषी विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. मूल्यमापन :
कृषी क्षेत्रात वाढीचा दर कमी झाला.
कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर २.४४%
उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ४.२९%
सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ७.८७ %
(वरील माहिती देणारे: Mr. MOHAN KALAMKAR, Yavatmal)
First in Indian Politics
1. First President of India - Dr. Rajendra Prasad.
2. First Woman President of India - Mrs. Pratibha Patil
3. First Vice President of India - Dr. S. Radha Krishnan.
4. First Muslim President of India - Dr. Zakir Hussain.
5. First Sikh President of India - Giani Jail Singh.
6. First Prime Minister of India - Pt. Jawahar Lal Nehru.
7. First Woman Prime Minister of India - Mrs. Indira Gandhi.
8. First Speaker of the Lok Sabha - G.V. Mavlankar.
9. First Chief Justice of India Justice H.L. Kania.
10. First Chairman of the Rajaya Sabha - Dr. S. Radhakrishnan.
11. First Woman Governor of a State - Mrs. Sarojini Naidu.
12. First Woman Chief Minister - Mrs. Sucheta Kripalani.
13. First Woman Central Minister - Rajkumari Amrit Kaur.
14. First Woman Speaker of Lok Sabha - Mrs. Shanno Devi.
15. First Woman IAS Officer - Anna George.
16. First Woman IPS Officer - Kiran Bedi.
17. First Woman Advocate - Carnelia Sorabji.
18. First Woman Judge - Anna Chandi.
19. First Woman Judge of High Court - Anna Chandi.
20. First Woman Judge of Supreme Court - M. Fathima Beevi.
21. First Woman Chief Justice of High Court Justice - Leela Seth.
22 First Chairman of Planning Commission - Pt. Jawahar Lal Nehru.
23. First Chairman of Finance Commission - K.C. Niyogi.
24. First Acting Prime Minister of India - Guljari Lal Nanda.
25. First Deputy Speaker of Lok Sabha - M. Ananthasayanam Ayyangar.
26. First recognised leader of opposition in Lok Sabha - Y.V. Chavan.
27. First recognised leader of opposition in Rajya Sabha - Lokpati Tripathi.
28. First Lok Sabha Election 1952.
29. First Chief Election Commissioner of India - Sukumar Sen.
30. First Woman Chief Election Commissioner of India - Smt. V.S. Rama Devi.

(वरील माहिती देणारे: Mr.Sunny Mohan Gupta, Yavatmal)

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा- सिंधुदुर्ग.

(वरील माहिती देणारे: Mr.Nagsen D Surwade, Washim)

व्यक्ती समाधी स्थळे
  • ज्ञानेश्वर: आळंदी (पुणे)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर: चैत्यभुमी (मुंबई)
  • यशवंतराव चव्हाण: प्रीतीसंगम (कराड)
  • महात्मा गांधी: राजघाट (दिल्ली)
  • इंदिरा गांधी: शक्तीस्थळ (दिल्ली)
  • राजीव गांधी: वीरभुमी (दिल्ली)
  • संजय गांधी: शांतीघाट (दिल्ली)
  • पंडीत नेहरु: शांतीवन (दिल्ली)
  • चरणसिंग: किसानघाट (दिल्ली)
  • लाल बहादुर शास्त्री: विजयघाट (दिल्ली)
  • मोरारजी देसाई: अभयघाट (दिल्ली)
  • ग्यानी झैलसिंग: एकतास्थळ (दिल्ली)
महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे:
        (कवी/साहित्यिक टोपण नावे)
  • कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
  • गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
  • त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
  • प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
  • राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
  • विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
  • निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
  • माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
  • चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
  • आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

(वरील माहिती देणारे: श्रीकांत जाधव, सातारा)
भारतातील सरोवर:
  • कोलेरू : प्रदेश
  • पुलीकत: आंध्रा प्रदेश आणि तमिळनाडू
  • पुष्कर : राज्यस्थान
  • चिल्का: ओरिसा
  • लोणार: महाराष्ट्र
  • वूलर दल: जम्मू आणि काश्मीर
  • लोकतक: मणिपूर
(वरील माहिती देणारे: जितेंद्र राणे, बुलडाणा)
गणिताची विभाज्यता कसोट्या:
वर्गसंख्या- वर्गसंख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक कधीही नसतात. मात्र, उरलेले 1, 4, 5, 6, 9, 0 हे अंक असतात. 
एकक स्थानी शून्य दोनवेळा अथवा समप्रमाणात असेल तर, ती संख्या वर्गसंख्या असते. तसेच एकक स्थानी 5 हा अंक असेल, तर दशक स्थानी 2 हा अंक हवाच तरच ती संख्या वर्गसंख्या असते.

25 चा वर्ग = प्रथम एकक स्थानत्या 5 चा वर्ग = 25 मांडावे, त्यानंतर (25मधील) 2×त्यापुढील संख्या 3 यांचा गुणाकार=6 मांडावी म्हणजे—625 होय. एकक स्थानी 5 हा अंक असल्यास या पध्दतीने वर्ग काढावा.

फक्त 9 हा अंक असणाऱ्या संथ्येचा वर्ग पुढीलप्रमाणे काढावा:99 चा वर्ग = 99- 1 = 98 आलेल्या (98 या) वजाबाकीतील 9 च्या संख्येइतकी शून्ये त्यापुढे लिहून पुन्हा पुढे 1 हा अंक लिहावा. म्हणजे, 99 या संख्येचा वर्ग = 9801 हा होय.
9999 चा वर्ग = 99980001 

विभाज्यतेच्या कसोट्या:• 2 ची कसोटी- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात, त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो.
• 3 ची कसोटी- संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो.
• 4 ची कसोटी- एकक व दशक स्थानचा अंक मिळून होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असेल तर..
• 5 ची कसोटी- एकक स्थानी 0 व 5 असेल तर ..
• 6 ची कसोटी- ज्या संख्येला 2 व 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो.
• 7 ची कसोटी- एकक स्थानच्या संख्येला प्रथम 2 ने गुणावे. आलेला गुणाकार उर्वरीत संख्येमधून वजा करून, त्या वजाबाकीला 7 ने भाग जात असेल, तर त्या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो. उदा. 371 = 
1 × 2 = 2,
37 – 2 =35
35 ÷ 7 म्हणून 371 या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो.
* 8 ची कसोटी- एकक, दशम व शतक स्थानचा अंक मिळून होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जात असेल तर..तसेच 2 व 4 ने पूर्ण भाग जात असेल, तर त्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो.
*9 ची कसोटी- संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल, तर..
*10 ची कसोटी- एकक स्थानी शून्य असेल तर..
*11 ची कसोटी- संख्येतील सम स्थानच्या अंकाची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक शून्य किंवा 11 च्या पटीत असेल तर..
तसेच जर समान अंक असतील तर ते सम पटीत आले असतील, तर उदा. 3333, 4444
शेवटच्या अंकांची बेरीज मधल्या अंकाएवढी येत असेल तर..उदा. 693, 451, 594 
एकक स्थानी 1 असेल तर पुढीलप्रमाणे वर्ग करावा.
31 चा वर्ग =
प्रथम 30 चा वर्ग =900 करावा. नंतर 30 × 2 +1 =61 त्यानंतर येणाऱ्या दोन्ही संख्येची बेरीज करावी 900 + 61 = 961

महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल:
• ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट माजुली हे होय.
• नर्मदा नदीवर जबलपूरजवळ धुवांधार धबधबा आहे.
• कावेरीचा उगम कर्नाटक राज्यात ब्रम्हगिरी पर्वतात आहे.
• तापीची प्रमुख उपनदी पूर्णा ही होय.
• उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यास लू म्हणतात.
• पश्चिम बंगाल , झारखंडमध्ये कालबैसाखी म्हणतात.
• कर्नाटक व केरळमध्ये ब्लॉसम शॉवर्स म्हणतात.
• महाराष्ट्रात आम्रसरी किंवा वळीवाचा पाऊस म्हणतात.
• ऑक्टोबर व नोव्हेंबर हा मान्सून परतीचा काळ असतो.
• केरळच्या किनारी भागात थोरीयमचे साठे आढळतात.
• अभ्रकाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.
• पोलाद तयार करण्यासाठी मॅंगनीज वापरतात.
• बॉक्साईटपासून ॲल्युनिनीयम तयार करतात.
• ज्वारी उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे.
• भारतातील छोटा नागपूर पठार हा खनिजाचे पठार म्हणून ओळखतात.
• सूर्यमालिका—बुध,- शुक्र,- पृथ्वी,- मंगळ,- गुरू,- शनि,- युरेनस,- नेपच्यून
( सूचना—वरील ग्रहमालेचे निरीक्षण केल्यास ती लक्षात ठेवणे सोपे जाईल. आपल्या आठवड्याच्या दिवसांवरून लक्षात ठेवता येईल. सूर्याजवळचा प्रथम गृह बुध त्यानंतरचा वार गुरूवार सोडायचा म्हणजे पुढचा गृह शुक्र मिळेल. त्यानंतरचा शनि सोडल्यास रवी ,त्यासाठी पृथ्वी धरायची, त्यानंतर सोमवार सोडल्यास येणारा गृह मंगळ, त्यानंतरचा बुधवार सोडायचा म्हणजे येणारा गृह गुरू, त्यानंतरचा वार शुक्र सोडल्यास येणारा गृह शनि. आणि शेवटचे युरेनस व नेपच्यून असे लक्षात ठेवायचे.)

• 21 जून व 22 डिसेंबर यांना आयन दिन म्हणून ओळखतात.
• 22 मार्च व 23 सप्टेंबर यांना संपात दिन म्हणतात.
• प्रतिरोध प्रकारचा पाऊस जगात सर्वात जास्त पडतो.
• चंद्रग्रहणाला सूर्य, पृथ्वी, आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात.
• पॅसिफीक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल आहे.
• प्राथमिक व्यवसाय—वनोत्पादन, मासेमारी, शेती, पशुपालन, खाणकाम.
• द्वितीयक व्यवसाय—कापसापासून कापड तयार करणे. उसाच्या रसापासून साखर तयार करणे,
• तृतीयक व्यवसाय--- वाहतूक, टपाल, बॅंक इ.
• जगातील 75% सोने आफ्रिका खंडात सापडते.
• भारताचे अंटार्कटिकावरील संशोधन केंद्र मैत्री होय.
• सातपुडा पर्वतरांगेत पंचमढी व तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणे आहेत.

जागतिक माहिती आधिकार दिन:

माहिती अधिकार हा हक्क भारतीय जनतेला १२ oct. २००५ ला मिळाला. या अधिकारामुळे पुर्णपणे भ्रष्टाचार संपणार नसला तरी त्यावर अंकुश जरुर पडणार होता. अर्थातच प्रशासनातील पारदर्शकतेसाठी हा कायदा अत्यंत महत्वपुर्ण ठरला. यात कोणाचेही दुमत नसावे. पहिला माहिती अधीकार स्विडन या देशात 1776 मध्ये अंमलात आला. जगातिल वढत्या भ्रष्टाचारला आळा घालण्यासाठी 1946 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने त्या संदर्भात ठराव केला. सध्या 56 पेक्षा जास्त देशात हा कायदा अस्तित्वात आहे. आणि भारत 57 व्या क्रमांकावर आहे. या कायद्याचा जास्त प्रचार 1990 पासुन झाला. बलोरियमध्ये 27 सप्टेंबर 2002 या दिवशी Freedom of Information Network नावाची संघटना स्थपन झाली आणि त्या नंतर जगभरात माहितीच्या अधिकाराबाबत जागरुकता वाढतच गेली, आणि मग त्यासाठी कायद्याची मागणी होऊ लागली. जागतिक माहिती आधिकार दिन प्रथम 27 सप्टेंबर 2003 रोजी साजरा झाला होता. 28 सप्टेंबर हा आता आधीकृतपणे साजरा केला जतो. महराष्ट्र राज्यात august 2003 मध्ये माहितीचा आधिकार स्वतःचा कायदा होता. 12 2005 पासुन माहिती आधिकार देशभरात लागु झाला. भारतात सरकारी कामांमध्ये पारदर्शकता व जबाबदारी निर्माण करण्याच्या दृष्टीने, भ्रष्टाचाराला आळा घालण्यकरीता ख-या अर्थाने लोकशाही राबविण्याकरीता व लोकांना माहिती मिळावी म्हणून माहितीचा आधिकार कायदा 2005 अस्तित्वात आला. माहितीचा आधिकार म्हणजे कोणत्याही कर्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणत असलेली व या नियमानूसार मिळवता येण्याजोगी महिती जाणुन घेण आवश्यक कागदपत्रं मिळवणं, हा प्रत्येक नागरीकाचा हक्क असुन तो मुलभुत अधिकार आहे. असा हा आधिकार नियम 2005 मध्ये सर्वांना मिळाला.

भारताची मंगळ मोहिम:
इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातुन भारताच्या पीएसएलव्ही सी-२५ या उपग्रह प्रेक्षपकाने मंगळाकडे यशस्वी झेप घेतली या झेपेमुळे जो मंगळ आजपर्यंत अनेकांच्या जन्मपत्रिकेत आडवा आला तो आता चक्क आपल्या आवाक्यात येणार आहे. मार्स ऑर्बायटर मिशन म्हणजेच मॉम असे या मोहिमेचे नाव असून भारताची ही पहिली मंगळ मोहीम आहे. याआधी चांद्रमोहीम यशस्वी केलेल्या इस्रोनं, मंगळावर विजय मिळवून आणखी एक इतिहास रचण्याच्या दिशेनं आज महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. मंगळाकडे झेपावलेले हे यान २९९ दिवसांनी सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल. दरम्यान, रॉकेटच्या प्रशांत महासागरावरील प्रवासावर देखरेख करण्यासाठी 'नालंदा' आणि 'यमुना' या दोन नौका फिजीजवळ पोहोचल्या आहेत. श्रीहरिकोटापासून सुमारे तीन हजार सागरी मैल दूर असणाऱ्या या ठिकाणाच्यावर अवकाशात मंगलयान रॉकेटपासून अलग होणार आहे. ही घटना उड्डाणापासून २७ मिनिटांनी होणार असून त्यावर देखरेख करण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ ४५ दिवस प्रवास करून तिथे पोहोचले आहेत.

भारताच्या मोहिमेचा हेतू काय?
अमेरिकादी देशांनी मंगळ मोहिमा राबविल्या असल्या, तरी मंगळाचे अजूनही अनेक पैलू अज्ञात असून त्यांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे मत इस्रोचे शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या ग्रहांवर याने पाठवण्याची आपली क्षमता निर्माण करणे हाही या मंगळ मोहिमेचा एक हेतू असल्याचे ते सांगतात. मंगळाच्या अत्यंत विरळ वातावरणाचा, त्याच्या भूरचनेचा, तेथील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा आणि भविष्यात तेथील मानवी वास्तव्याच्या शक्यतेचा वेध भारतीय मंगळ मोहीम घेणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि युरोपनंतर मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे यान पाठवणारा भारत केवळ चौथा देश ठरेल.

मंगळ मोहिमा कशासाठी?
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर आयर्न ऑक्साइडचे अस्तित्व असल्याने तो तांबूस दिसतो. त्यामुळे त्याला 'रेड प्लॅनेट'ही म्हटले जाते. हा ग्रह मानवाला खूप आधीपासून खुणावत आहे. भविष्यात मंगळावर वसाहत करण्याची शक्यताही पडताळून पाहिली जात आहे. मंगळावर यान पाठविण्याला सुरुवात झाली ती साठच्या दशकात. अमेरिकेतील 'नासा'ने मंगळावर प्रत्यक्ष यान उतरवून तेथील पाण्याचा शोधही लावला आहे. तेथील जीवसृष्टीचा शोधही सुरू आहे.
कसा असेल प्रवास?

पाच नोव्हेंबरला मंगलयानाचे प्रक्षेपण होईल. पीएसएलव्ही मंगलयानाला प्रथम पृथ्वीभोवती ६०० किलोमीटर बाय २ लाख १५ हजार किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करेल. मग यानावर असणाऱ्या इंधनयंत्रणेच्या साह्याने पृथ्वीभोवती सहा प्रदक्षिणा मारून यान मंगळाच्या दिशेने प्रवास सुरू करेल. २९९ दिवसांनी सप्टेंबर २०१४ मध्ये मंगलयान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल. मंगळाभोवतीची त्याची कक्षा ५०० किलोमीटर बाय ८० हजार किलोमीटर अशी असेल.

कसे आहे मंगलयान?
मंगल यानावर एकूण १५ किलो वजनाची पाच वैज्ञानिक उपकरणे बसवलेली असून, त्याव्यतिरिक्त अपेक्षित कक्षा गाठण्यासाठी आणि कक्षा सुधारण्यासाठी स्वतंत्र इंधन यंत्रणा; तसेच यानाच्या संचालनासाठी लागणाऱ्या उर्जेसाठी सोलार पॅनेल बसवण्यात आले आहेत. मिथेन सेन्सर फॉर मार्स (एमएसएम), मार्स कलर कॅमेरा (एमसीसी), मार्स एक्झोस्फेरिक न्यूट्रल कंपोझिशन एनलायझर (मेनका), टीआयआर स्पेक्ट्रोमीटर (टीआयएस), लेमन अल्फा फोटोमीटर (लॅप) या पाच उपकरणांद्वारे मंगलयान मंगळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करेल. यानाचे एकूण वजन ५०० किलो असेल, तर ८५० किलोचे इंधन वापरून ते मंगळापर्यंत पोहोचेल आणि अपेक्षित कक्षा गाठेल.
(वरील माहिती देणारे: श्रीकांत वाडेलकर, अमरावती)

जगातील अणु चाचण्या:

  • यु. एस.-1945
  • यु. एस.एस. आर.- 1949
  • यु. के.- 1952
  • फ्रान्स- 1996
  • चीन- 1964
  • भारत- 1974, 1998
  • पाकिस्तान- 1998
  • नॉर्थ कोरिया- 2009
(वरील माहिती देणारे: जितेंद्र राणे)
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तीचे नावे खालिलप्रमाणे:
अ.क्र.
वर्ष
पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचे नांव
कार्यक्षेत्र
1996
पुरुषोत्तम लक्ष्मन देशपांडे
साहित्य
1997
लत्ता मंगेशकर
कला-संगीत
1999
विजय भटकर
विज्ञान
2001
सचिन तेंडूलकर
खेळ
2002
भीमसेन जोशी
कला-संगीत
2003
अभय बंग आणि राणी बंग
औषधे सुविधा
2004
बाबा आमटे
सामाजिक कार्य
2005
रघुनाथ अनंता माशेलकर
विज्ञान
2006
रतन टाटा
लोक प्रशासन
१०
2007
आर.के.पाटील
सामाजिक कार्य
११
2008
नाना धर्माधिकारी
सामाजिक कार्य
१२
2008
मंगेश पाडगावकर
साहित्य
१३
2009
सोलूचना लाटकर
कला-चित्रपट
१४
2010
जयंत नारळीकर
विज्ञान
१५
2011
डॉ.अनिल काकोडकर
विज्ञान


--------

जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - पोलीस भरती (सामान्यज्ञान)

प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख :
पक्ष अध्यक्ष

* काँग्रेस (आय) - श्रीमती सोनिया गांधी
* भारतीय जनता पार्टी नितीन गडकरी
* बहुजन समाजवादी पक्ष मायावती
* समाजवादी पार्टी मुलायमसिंग यादव
* लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान
* मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी प्रकाश करात
* शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (कार्य. अध्यक्ष)
* महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे
* तेलगू देसम एन. चंद्राबाबू नायडू
* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
* आसाम गण परिषद वृंदावन गोस्वामी
* तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी
* झारखंड मुक्ती मोर्चा शिबू सोरेन
* अकाली दल प्रकाशसिंग बादल
* राष्ट्रीय लोकदल ओमप्रकाश चौताला
* नॅशनल कॉन्फरन्स डॉ. फारुख अब्दुल्ला
* राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव
* जनता दल (संयुक्त) शरद यादव
* प्रजाराज्यम चिरंजीवी
* अण्णा द्रमुक जयललिता

प्रमुख संघटना, स्थापना वर्ष व मुख्यालय
संघटना स्थापना वर्ष मुख्यालय

* नाटो १९४९ ब्रुसेल्स
* ओपेक १९६० व्हिएन्ना
* सार्क १९८५ काठमांडू
* अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल १९६१ लंडन
* युनेस्को १९४६ पॅरिस
* इंटरपोल १९५६ पॅरिस
* रेडक्रॉस १८३३ जिनिव्हा
* युनो १९४५ न्यूयॉर्क
* आसियान १९६७ जकार्ता
* युनिसेफ - १९४६ न्यूयॉर्क
भारतातील सात आश्चर्ये
* ताजमहाल - आग्रा
* गोलघुमट - विजापूर
* मीनाक्षी मंदिर - मदुराई
* गोमटेश्वराचा पुतळा - श्रावण बेळगोळा
* वेरुळ - औरंगाबाद
* कुतुबमिनार - दिल्ली
* जयस्तंभ - चितोडगड
महत्त्वाचे राष्ट्रीय दिवस
* १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन
* २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन
* ५ एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन
* २१ मे आतंकवादी विरोधी दिन
* २९ जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन
* २६ जुलै कारगिल दिवस
* २० ऑगस्ट सद्भावना दिवस
* ५ सप्टेंबर शिक्षक दिवस
* १२ नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन
* २३ डिसेंबर किसान दिवस

प्रमुख शहरांच्या नावातील बदल
* बॉम्बे - मुंबई
* मद्रास - चेन्नई
* बंगलोर - बंगळूरू
* त्रिवेंद्रम - तिरुअनंतपूरम
* कलकत्ता - कोलकाता
* गोहत्ती - गुवाहाटी
प्रमुख संस्था, संग्रहालये व मुख्यालय संस्था/ संग्रहालय मुख्यालय
* हाफकिन इन्स्टिय़ूट मुंबई
* नॅशनल म्युझियम कोलकाता
* स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली (नाशिक)
* राजा केळकर वस्तूसंग्रहालय पुणे
* इंडियन पॅराशूट ट्रेनिंग कॉलेज आग्रा
* सरदार वल्लभभाई पटेल
राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद
* सालारजंग म्युझियम हैदराबाद
* इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी डेहराडून
* जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई
* छत्रपती शिवाजी म्युझियम मुंबई
* नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी खडकवासला, पुणे
महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस
* ८ मार्च जागतिक महिला दिन
* १५ मार्च जागतिक ग्राहक दिन
* २१ मार्च जागतिक वनदिवस
* २२ मार्च जागतिक जल दिवस
* ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस
* २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन
* ५ जून जागतिक पर्यावरण दिवस
* ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस
* ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
* १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
* २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन
* १ डिसेंबर जागतिक एड्स दिन
बहुचर्चित पुस्तके व लेखक पुस्तकाचे नाव लेखक 
* थ्री इडियटस चेतन भगत
* लिव्हिंग हिस्ट्री हिलरी क्लिंटन
* माय कंट्री, माय लाइफ लालकृष्ण अडवाणी
* ड्रिम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा
* लज्जा तसलीमा नसरीन
* हेडस अँड टेल्स मेनका गांधी
* यशवंतराव ते विलासराव - विश्वास मेहेंदळे
* बाळ ठाकरे : ए फोटोबायोग्राफी राज ठाकरे
* आय डेअर किरण बेदी
* रोमान्सिंग विथ लाइफ देव आनंद
* आमचा बाप आणि आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
* मिडनाईट चिल्ड्रेन्स सलमान रश्दी
* लिव्हिंग विथ ऑनर्स शिव खेरा
* स्पीकर्स डायरी मनोहर जोशी
* माझी परदेशी डायरी सुशीलकुमार शिंदे
शोध व संशोधक
शास्त्रज्ञ शोध

* एडवर्ड जेन्नर - देवीची लस
* रॉबर्ट कॉक - क्षयरोगावरील लस
* रोनाल्ड रॉस - मलेरियाचे जंतू
* सॅम्युएल हायनेमन - होमिओपॅथी
* लॅडस्टायनर - रक्त संक्रमण
(रक्त बदलणे)
* फ्रेडरिक बेटिंग - इन्शुलिन
* डॉ. साल्क - पोलिओ लस
* रॉटेनजन - क्ष-किरण टय़ूब
* ख्रिश्चन बनार्ड - कृत्रिम हृदयरोपणाची शस्त्रक्रिया
* विल्यम हार्वे - रक्ताभिसरणाची प्रक्रिया

महत्त्वाचे नृत्यप्रकार व संबंधित राज्य
* लावणी महाराष्ट्र
* कथक उत्तर प्रदेश
* मोहिनी अट्टम केरळ
* कुचीपुडी आंध्र प्रदेश
* झुमर राजस्थान
* बिहू आसाम
* कथकली केरळ
* गरबा गुजरात
* भरतनाटय़म तामिळनाडू
* यक्षगान कर्नाटक
* नौटंकी उत्तर प्रदेश
* भांगडा पंजाब
महत्त्वाच्या व्यक्तींची सुधारित वेतनश्रेणी पद वेतन
* राष्ट्रपती - १ लाख ५० हजार रु.
* उपराष्ट्रपती - १ लाख २५ हजार रु.
* राज्यपाल - १ लाख १० हजार रु.
* नायब राज्यपाल - ८० हजार रु.
* मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय १ लाख रु.
* न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय - ९० हजार रु.
* मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय - ९० हजार रु.
* न्यायाधीश, उच्च न्यायालय - ८० हजार रु.
* अध्यक्ष, संघ लोकसेवा आयोग - ९० हजार
समाधीस्थळ व संबंधित व्यक्ती
* शक्तिस्थळ - इंदिरा गांधी
* शांतीघाट - संजय गांधी
* राजघाट - महात्मा गांधी
* किसानघाट - चरणसिंग
* चैत्यभूमी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* शांतिवन - पंडित नेहरू
* वीरभूमी - राजीव गांधी
* विजयघाट - लालबहाद्दूर शास्त्री
* प्रीतीसंगम - यशवंतराव चव्हाण
* अक्षयघाट - मोरारजी देसाई
प्रमुख रोग व प्रभावीत ठिकाण
* मलेरिया प्लीहा
* मोतीबिंदू डोळे
* गलगंड थॉयराईड ग्लँडस
* ल्युकेमिया रक्त
* न्यूमोनिया फुफ्फुसे
* क्षयरोग फुफ्फुसे
* कावीळ यकृत
* टॉयफाईड मोठे आतडे
* एक्झिमा त्वचा
* रक्तदाब धमनी काठिण्य
-------------
पृथ्वीवरील पाणी प्रमाण:
* 71% पाणी आणि 29% जमीन आहे.
71% पाण्यापैकी 97% खारे पाणी, 2% बर्फ आणि 1% गोड पाणी (पिण्याजोगे) आहे.

* प्राकृतिक भारत:
  1. पर्वतीय प्रदेश : 10% (10.7)
  2. डोंगर : 18.6%
  3. पथारी प्रदेश : 27.7%
  4. मैदानी प्रदेश : 43.0%

मित्रानो, आपल्याला अनेक प्रसिद्ध व्यक्तीचे संपूर्ण नावे माहित नसतात. अशा काही व्यक्तीची संपूर्ण नावे तुमच्या माहितीसाठी...
  • संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले
  • संत नामदेव - नामदेव दामाजी रेळेकर
  • संत ज्ञानेश्वर - ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी
  • गाडगे महाराज - डेबुजी झिग्राजी जानोरकर
  • समर्थ रामदास - नारायण सूर्याजी ठोसार
  • राजश्री शाहू महाराज - यशवंत आबासाहेब घाटगे
  • स्वामी विवेकानंद - नरेंद्र विश्वनाथ दत्ता
  • दादासाहे फाळके - धुदिराम गोविंद फाळके
  • व्ही.शांताराम - शांताराम राजाराम वानकुंद्रे
-----------------------------------------
संभाव्य परीक्षाभिमुख प्रश्न
* सर्वप्रथम भारतात सन १८७२ साली लॉर्ड मेयोच्या काळात जनगणनेस सुरुवात झाली.
* संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना सन १८८१ पासून सुरू करण्यात आली.
* २००१ च्या जनगणने वेळी भारताचे जनगणना आयुक्त- जे. के. बांठीया होते.

* २०११ मध्ये भारताची १५ वी जनगणना पार पडणार आहे.
* १ मार्च २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०२ कोटी, ७० लाख होती.
* २००१ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या- ७२.२२%, शहरी लोकसंख्या- २६.२२%.
* २००१ च्या जनगणनेनुसार राज्याचा उतरता क्रम (लोकसंख्या)- उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरता- केरळ, मिझोराम, नागालॅण्ड.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८%, पुरुष साक्षरता- ७५.८५%, स्त्री साक्षरता- ५४.१६%, सर्वात कमी साक्षरता बिहार- ३३.२७%.
* जगामध्ये लोकसंख्या वाढीमध्ये पहिला क्रमांक भारताचा लागतो.
संरक्षणविषयक घडामोडी
* सध्या भारताशी संरक्षण सामग्रीच्या विक्रीबाबत इस्राइल देश आघाडीवर आहे.
* २००९ मध्ये भारत सरकारने इजिप्त देशाशी गुन्हेगार हस्तांतरण करार केला.
* सेजील या अग्नीबाणाची चाचणी इराण देशाने घेतली.
* २००९ मध्ये चाचणी घेतलेले ‘शौर्य’ भारताचे क्षेपणास्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.
* जानेवारी २००९ मध्ये भारत व रशियादरम्यान पार पडलेल्या नौदल कवायती- इंद्र.
* ‘बैकानूर’ हे अवकाश प्रक्षेपण स्थळ कझाकिस्तान देशात आहे.
* जहाजविरोधी क्षेपणास्त्र ‘हार्पून-२’ हे भारताला अमेरिका देशाकडून मिळणार आहे.
* भारताने ‘गोर्शकोव्ह’ ही युद्धनौका रशिया देशाकडून खरेदी केली.
* भारत व फ्रान्स संयुक्तपणे विकसित करीत असलेले क्षेपणास्त्र- मित्र.
अर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी
* चेन्नई हे शहर भारताचे ‘रिटेल कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते.
* स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली ११,१११ वी शाखा गुवाहाटी येथे सुरू केली.
* जगातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या लोकांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचा देश- डेन्मार्क.
* दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट- समता व सामाजिक न्यायसह विकास.
* अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक- वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे.
* भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य- हरियाणा.
* सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष- न्या. बी. एन. श्रीकृष्णन.
* सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य- उत्तर प्रदेश.
* केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड- आंध्र प्रदेश.
* युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले.
* युटीआय बँकेचे अ‍ॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले.
क्रीडाविषयक घडामोडी
* ‘बटरफ्लाय’ हा प्रकार जलतरण खेळाशी संबंधित आहे.
* ‘डकवर्थ लुईस नियम’ क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
* ‘तरुणदीप राय’ हा खेळाडू तिरंदाजी खेळाशी संबंधित आहे.
* क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य- महाराष्ट्र.
* २०१० ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा- दक्षिण आफ्रिका.
* ज्योती रंधवा ही गोल्फ क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे.
* बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय- अभिनव बिंद्रा.
* चेतन आनंद हा खेळाडू बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
महत्त्वाचे दिवस
* २३ मार्च- जागतिक हवामान दिन * १२ मार्च- जागतिक मूत्रपिंड दिन * २४ मार्च- जागतिक क्षयरोग निवारण दिन * ७ एप्रिल- जागतिक आरोग्य दिवस * २२ एप्रिल- जागतिक वसुंधरा दिन * १६ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन * १५ मार्च- जागतिक ग्राहक दिन * २१ मार्च- जागतिक वन दिन * ५ जून- जागतिक पर्यावरण दिवस * २९ जून- राष्ट्रीय सांख्यिकी दिन * ६ जानेवारी- पत्रकार दिवस * ८ सप्टेंबर- जागतिक साक्षरता दिन * २४ जानेवारी- राष्ट्रीय बालिका दिन * २६ जुलै- सामाजिक न्याय दिवस
महत्त्वाची समिती व आयोग
* सेतुसमुद्रम प्रकल्पाचा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने डॉ. राजेंद्र पचौरी समिती नियुक्त केली.
* राष्ट्रीय ज्ञान आयोग सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला.
* गुज्जर आंदोलनाच्या हिंसाचारामुळे झालेले नुकसान तपासण्यासाठी नेमण्यात आलेली समिती- फतेचंद बन्सल समिती.
* नर्सरी शाळेतील प्रवेशासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी- अशोक गांगुली समिती.
* अल्पसंख्याकांच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी- राजेंद्र सच्चर समिती.
* भारतातील हवाई क्षेत्राच्या विकासासाठी नेमण्यात आलेली समिती- नरेशचंद्रा समिती.

महत्त्वाची पुस्तके
* एन्ड ऑफ हिस्ट्री- फ्रान्सिस फुकुयामा
* ए ट्रेन टू पाकिस्तान- खुशवंत सिंग
* ए मिशन इन काश्मीर- नमिता देवीदयाल
* डॉटर ऑफ द ईस्ट- बेनझीर भुट्टो
* ए लॉग वॉक टू फ्रिडम- नेल्सन मंडेला
* विंग्स ऑफ फायर- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
० २०१० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोची केरळ येथे पार पडणार आहे.
० २०१० मध्ये विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारत (नवी दिल्ली)
० जागतिक युवा व्हॉलीबॉल स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. विजेता संघ : ब्राझील, उपविजेता : क्युबा
० २००९ फ्रेंच ओपन टेनिस : रशियाची स्वेतलाना कुज्नेत्सोवा
० आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष : लिअ‍ॅद्रो नेग्री
० आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष : जोसेफ ब्लॅटेर
० रोम येथे पार पडलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत चीनच्या झाओजिंगने विश्वविक्रम केला.
० संदीप शेजवळ व वीरधवल खाडे भारताचे जलतरणपटू आहेत.
० सोमदेव देववर्मन हा खेळाडू टेनिस खेळाशी संबंधित आहे.
० सुदीरमन करंडक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
० नेहरू करंडक फुटबॉल खेळाशी संबंधित आहे.
० अझलन शहा कप हॉकी खेळाशी संबंधित आहे.
० सानामाचा चानू व प्रतिमा कुमारी वेटलिफ्टिंग खेळाशी संबंधित आहे.
० सायकलिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या गेलेल्या ‘टूर डी फ्रान्स’ सायकल शर्यतीत स्पेनचा अल्बर्ट कोन्टाडोर याने दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले.
० शरथ कमल टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहे.
० चवथ्या जागतिक मिलिटरी स्पर्धा (२००७) हैदराबाद येथे पार पडल्या.
० देवधर चषक, दुलिप करंडक, इराणी चषक, रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
० ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने सुवर्णपदक पटकावले.
संरक्षणविषयक
० भारतीय नौसेनेची संपूर्ण विश्वभर भ्रमण करणारी बोट : आयएनएस तरंगिनी.
० भारताच्या ‘अग्नी १’ या समकक्ष पाकिस्तानचे क्षेपणास्त्र : घौरी
० भारताचे पहिले वैमानिकरहित विमान : लक्ष्य
० जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र : पृथ्वी, अग्नी, नाग
० जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र : आकाश, त्रिशूल, ब्राह्मोस
० ध्वनीच्या तिप्पट वेगाने २९० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेणारे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपमे विकसित केलेले ‘ब्राह्मोस’ हे सुपरसोनिक जहाजभेदी क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
० अमेरिकन बनावटीची वैमानिक विरहित विमाने : चकोर
० सूर्य हे ५००० कि.मी. पल्ल्याचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.
० भारतीय हवाई दलात महिला वैमानिकांचा समावेश : १७ डिसेंबर, १९९४ पासून.
अर्थ व वाणिज्यविषयक
० भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार अमेरिका देशाशी आहे.
० भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक करणारा देश : मॉरिशस, दुसरा-अमेरिका, तिसरा-जपान
० जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था : चीन, दुसरा-भारत.
* भारतात दारिद्रय़ रेषेखालील लोकांचे सर्वाधिक प्रमाण : ओरिसा (४६.४०टक्के)
० भारतात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारे राज्य : महाराष्ट्र
० मंदी आणि आर्थिक संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करण्याचा भारताचा जगात ऑस्ट्रेलिया, चीननंतर तिसरा क्रमांक लागतो.
शैक्षणिकविषयक व आरोग्यविषयक
० भारतातील पहिला संगणक साक्षर जिल्हा : मल्लापुरम (केरळ)
० भारतीय संशोधकांनी म्हशीचे जगातील दुसरे क्लोन तयार केले असून ‘गरिमा’ असे नाव ठेवण्यात आले आहे. पहिले क्लोन ‘गौरी’ याच संशोधकांनी निर्माण केले होते.
० स्वाईन फ्ल्यू हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या H1N1 या विषाणूमुळे होतो. मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण २१ एप्रिल, २००९ रोजी आढळला. H1N1 हा विषाणू इवसन संस्थेद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो.
० मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
इतर प्रश्न
० भारताची १०१ वी घटना दुरुस्ती जीवनावश्यक वस्तूंबाबत असून १०३वी घटनादुरुस्ती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याबाबत आहे.
० राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना : २३ फेब्रुवारी, २००७.
० भारत-पाक रेल्वे सेवा : समझोता एक्स्प्रेस
० भारत-पाक बस सेवा : साद-ए-सरहद, कारवाँ-ए-अमन
० भारत-बांग्लादेश रेल्वे सेवा : मैत्री एक्स्प्रेस
० विविध आयोग व समिती:
० बाबरी मशीद प्रकरण : लिबरहान आयोग
० गोध्रा हत्याकांड : नानावटी आयोग
० निवडणूक सुधारणाविषयक समिती : व्ही. एम. तारकुंडे समिती
० मतदारसंघ पुनर्रचना आयोग : न्या. कुलदीप सिंह
० महत्त्वाची योजना:
० मांगल्यसूत्र योजना : ही योजना अल्पदराची योजना असून केरळ राज्यामध्ये मुलीच्या लग्नामुळे तिच्या वडिलांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सरकारने राबविलेली योजना.


हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवीसनपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांना येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली.

सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ. स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ. स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ. स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.


यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचाजन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ. स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ. स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवाजीने केला. इ. स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.
[संपादन] गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
शिव मंदीर

* शिवाई देवी मंदिर-

सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ‘ मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणार्‍या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत.या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे.

* अंबरखाना-

शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात.एक वाट समोरच असणार्‍या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.

* पाण्याची टाकी-

वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.

* शिवकुंज -

हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे.याची स्थापना व उद्‌घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. जिजाबाईच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आविर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.

* शिवजन्मस्थान इमारत-
शिवकुंजापासूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवाजीचा जन्म झाला तेथे त्याचा एक पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी’नामक पाण्याचे टाके आहे.

* कडेलोट कडा-

येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.